✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. एका विवाहितेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करीत तिच्यावर बळजबरीने वारंवार अत्याचार करण्यात आला. अखेर त्रस्त होवून पीडितेने याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने अमरावती पोलिसांनी तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
प्राप्त माहितनुसार, एक विवाहिता आपल्या पतीला न सांगता वर्धा येथील म्हाडा कॉलनीतील रहिवासी तिच्या मैत्रिणीकडे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आली होती. मैत्रिणीच्या आजीला भेट देण्यासाठी पीडिता ही स्वयंपकखोलीत कपडे बदलवित असतानाच आरोपी राकेश आडे रा. म्हाडा कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ याने या महिलेचे विवस्त्र व्हिडीओ आपल्या मोबाईल फोन मध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला. या महिलेने याला नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापितकरुन महिलेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलीस ठाण्यात आरोपी राकेश आडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ती तक्रार रामनगर पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी राकेश आडे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348