महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या हस्ते रुग्णवाहिकाचे लोकार्पण.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून आज पोलिसांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
पोलिस हे समाजातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करते यांना यांच्या परिवाराला बीड जिल्ह्यामध्ये कुठेही रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली तर त्यांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आज या रुग्णवाहिकेचा अनावरण केला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संघटक प्रल्हाद पवार हे या ॲम्बुलन्सची जिम्मेदारी सांभाळणार आहेत. ॲम्बुलन्सच्या लोकार्पण सोहळ्यात संपर्क प्रमुख श्रीकांत देशमुख, टाकळगावचे सरपंच आमचे साडू रुद्रा कदम, अंकुश पवार, नाहुलीचे सरपंच पत्रकार बांधव व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348