नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्यासह विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या सर्वांचे पक्षात स्वागत करित त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
राज्यातील युती सरकार मुंबईचा कायापालट करत असून हे शहर अधिक सुंदर आणि सुशोभित करणार असल्याचे यासमयी स्पष्ट केले. शहरातील विविध विभागांतील पुनर्विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद केले. याप्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच विक्रोळीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348