नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- गोवर उपाययोजनांसंदर्भात आज महाराष्ट्रभरातील ग्रामीण तसेच शहरी आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांचे प्रमुख अधिकारी यांची 13 जानेवारी 2023 रोजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी दुरदृश्य प्राणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
गोवर आजाराची सध्याची राज्यातील विभागनिहाय, जिल्हानिहाय परिस्थिती काय आहे, याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. किती बालकांना लस अद्यापपर्यंत दिली नाही, त्याची माहिती अद्ययावत ठेवून त्यांच्यापर्यंत लस पोचेल याची व्यवस्था संबंधित आरोग्य यंत्रणेने करावी. लसीकरणासदंर्भात पालकांची जनजागृती करावी असे यावेळी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले.
गोवराची व्याप्ती वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. लसीकरणात कुठलीही कमतरता ठेवू नये. जेथे लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी गोवरचे संशयित रुग्ण कमी आढळले आहेत. त्यामुळे लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करावे अशा सूचनाहीआरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी यावेळी दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348