नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते या दोन्ही मेट्रो मार्गांचे लोकार्पण होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही या मेट्रोमार्गाच्या कामाची पाहणी केली. मेट्रो मार्गाचा हा टप्पा लोकांच्या सेवेत आल्यानंतर मुंबईतील अंधेरी, दहिसर, वर्सोवा, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रो मार्गामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच मुंबईकरांना कमी खर्चात आणि कमी वेळात आरामदायी प्रवास करता येणे शक्य होईल असे यासमयी बोलताना सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हेदेखील उपस्थित होते.