नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्र यांच्या साठी स्वच्छता विषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे दरम्यान उपस्थित स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई मित्र यांना कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे व्यवस्थापन, 4R (Reduce, Reuse, Recycle, Refuse) व स्वच्छतेची पंचसुत्री याबद्दल माहिती सांगण्यात आली. त्याचबरोबर सफाई मित्रांनी काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोण कोणती सेफ्टी किट वापरली पाहिजेत, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय स्वच्छतेच्या कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यशाळेला मिरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण च्या ब्रँड ॲम्बेसेडर व प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे, मिरा भाईंदर महानगर पालिकेचे उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

