नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण/मुंबई:- जगामध्ये पहिल्यांदाच जी20 चे अध्यक्षपद भारताकडे आले असून या जी20 च्या अध्यक्षस्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत, मोदी यांचे अभिनंदन व कौतूक करण्याच्या उद्देशाने भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या वतीने देशभर जी20 रांगोळी आयोजित केली होती, कल्याण पश्चिम येथे कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून काल नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेरील परिसरात जी20 ची रांगोळी साकारली. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित राहून रांगोळी पाहिली. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या कल्याणच्या अलका दिदी, कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्षा हेमलता पवार, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर महिला मोर्चा अध्यक्षा ज्योतीताई भोईर, महेश केळकर, एस एम. जोशी, मयुरेश आगलावे,समृध्दी देशपांडे, भावना मनराजा, स्नेहल सोपरकर, नम्रता चव्हान, निलांबरी देव, निताताई देसले, सविता गुप्ता, मकरंद ताम्हणे, हिरा आवारी, निशिगंधा पवार, रश्मी पवार, कविता वर्मा, माया दळवी आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.