प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याचा नामांकित जलतरणपटू साहील तराळे ने शिवछत्रपति क्रिडा संकुल बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य आलंपिक जलतरण स्पर्धत ५० मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रजत पदक जिंकले आहे. जिल्हाचे जलतरण मध्ये राज्य स्तरावर नाव लौकिक करून मानाचा तुरा रोवला आहे.
४ बाय १०० फ्रीस्टाइल रिले, ४ बाय २०० फ्रीस्टाइल रिले, मिक्स रिले मध्ये उत्तम कामगिरी केली. त्याला महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष तथा माजी संचालक क्रिडा, महाराष्ट्र. डाॅ.जयप्रकाश दुबळे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सहसचिव तथा राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे जलतरण प्रमुख डॉ. संभाजी भोसले वर्धा जिल्ह्य जलतरण संघटनेचे सर्व पदाधिकारी व सचिव नितीन डफळे, सेना दलाचे पदक प्राप्त जलतरणपटू निमिष मुळे, ओम गुडघे, सौ. रंजना वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
साहील तराळे याने आपल्या यशाचे श्रेय बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपरिषद जलतरण तलाव मित्र मंडळ वर्धा यांना दिले आहे. साहील हिंगणघाट येथील नामांकित शाळा जी. बी. एम. एम. हायस्कूलचे जेष्ठ गणित शिक्षक संजय तराळे यांचा मुलगा आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348