✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर पोलीसाना मुखबिरचे खात्रीशीर माहीती वरुन यातील आरोपी 1) कुणाल एकनाथ राजुरकर, वय 21 वर्ष, रा. खंडोबा वार्ड हिंगणघाट 2) पंकज दिलीप काळे, वय 28 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट काळ्या रंगाची हिरो सि.बी. झेंड एक्सट्रीम मोटर सायकल क्र. एम.एच. 49 ए 8716 गाडीनी देशी दारू मालाची अवैधरित्या वाहतुक करत आहे. या माहतीवरुन मौजा नंदोरी कोरा फाटा येथे मुखबिरचे खात्रीशीर खबरेवरून सापळा रचून दारूबंदीबाबत समुद्रपुर पोलीसानी नाका बंदी केली असता, आरोपी हे मोक्यावर रंगेहाथ देशी दारू मालाची अवैधरित्या विक्री करीता बिना परवाना वाहतुक करतांना मिळून आल्याने, तसेच त्यांचेकडे मोटर सायकलचे कागदपत्र व ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने, मोक्कावरच जप्ती कार्यवाही करून, दोन्ही आरोपीतांचे ताब्यातून 1,02,000 रू चा देशी दारू माल जप्त करून समुद्रपुर पो.स्टे. मध्येआरोपीतांविरूध्द कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे.
तसेच दि. 15 जानेवारी रोजी मुखबीरतर्फे मिळालेल्या खबरेवरून मौजा जाम चौरस्ता येथे सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो.रेड करून आरोपी नामे स्वप्नील राजेंद्र सावंत व आकाश विनायक चिताडे दोन्ही रा. हिंगणघाट यांचेवर अप क्र. 32/2023 व आरोपी नामे शुभम विनायक चिताडे व आशीष मनोहर मानकर दोन्ही रा. हिंगणघाट यांचेवर अप क्र. 33/2023 दारूबंदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. एकुण 06 आरोपीतांना अटक करून त्यांचे कडुन 03 मोटर सायकल व देशी विदेशी दारूचा माल असा जु.किं. 2,31,000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.