महाराष्ट्र संदेश न्युज रिपोर्टर
नवी दिल्ली:- दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वायरल व्हिडीओ मधून असे समोर आले की काही लोक दिल्ली पोलिसाला पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करत आहे.
काही नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी करून चक्क पोलिसांवरच हात उगारला, तर काही लोक या पोलिसाला मारहाणीचा व्हिडीओ बनवण्यात असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना खळबळजनक घटना नवी दिल्लीतील आनंद विहार येथील पोलीस स्टेशनमधील आहे.
नवी दिल्ली येथील आनंद विहार पोलिस स्टेशन येते 10 ते 12 लोकाचे टोळके पोलीस हवालदाराला घेरून मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर काही लोक घटनेचा व्हिडीओ काढत आहेत मात्र ते पोलिसाची मदत करण्यास पुढे सरसावले नाहीत. विशेष म्हणजे मारहाण झालेला कॉंस्टेंबल हा आनंद विहार स्टेशमधील हेड कॉंस्टेबल आहे. कॉंस्टेबलने अनेकवेळा माफी मागितली मात्र लोक मारपीट करूनच शांत बसले. खरं तर ही घटना 31 जुलै रोजी घडली आहे मात्र सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
वृत्तसंस्था एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिल्लीतील शाहदरा येथील आनंद विहार पोलिस स्टेशनमध्ये काही लोक हेड पोलिस कॉंन्स्टेबलला मारहाण करत असल्याचा आहे. प्राथमिक माहितीनुसार हा की व्हिडिओ 31 जुलैचा आहे आणि आता त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.