अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. न.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 15 जानेवारीला समर्पण फाउंडेशन सावनेर व वित्तेश्वर निधी बँक लिमिटेड सावनेर तर्फे युवा हुंकार 2023 ही आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन युथ हुंकार वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमात सावनेर तालुक्यातील एकूण 42 शाळा व महाविद्यालयातील 1-1 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयावर शाळेच्या गणवेशा मध्ये 7 मिनिटापर्यंत हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये भाषणे झाली.
जसे मला समजलेले स्वामी विवेकानंद,संयुक्त कुटुंब काळाची गरज,कोरोना ने आम्हाला काय शिकविले,राजकारण आणि तरुणाई,आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतीला तारक की मारक ?,विकास आणि पर्यावरण इत्यादी विषय होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्री.चैतन्य शेंबेकर संचालक ओमेगा हॉस्पिटल ओम चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर.प्रमुख पाहुणे अँड. श्री.शैलेशजी जैन, श्रीमती सविता आठवले प्राचार्य किलबिल स्कूल तसेच कार्यक्रमात निर्णयाक भूमिकेत अर्जुनसिंग सावजी, श्री.निसर्ग पवार आणि डॉ.विलास मानकर होते. यांनी मुलांना प्रोत्साहन देत वक्तृत्व शैलीच्या विकासासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता 8वी ते 10वी शालेय गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक कु.सुजल अशोक रामटेके इयत्ता 8 वी भन्साळी बुनियादी विद्या मंदिर टाकळी(भ.), द्वितीय पारितोषिक कु.धृव हरीश पानपत्ते इयत्ता 9 वी सारस्वत पब्लिक स्कूल सावनेर तर तृतीय पारितोषिक कुमारी जानवी पी.भेलकर इयत्ता 9 वी भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालय केळवद ला मिळाले.
तसेच महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक इयत्ता 11 ते पदवीधर गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक कु. साक्षी ऋषीकुमार चौधरी रेवनाथ चौरे कॉलेज बोरुजवाडा, द्वितीय पारितोषिक कु.त्रिशा आनंदराव बोकडे मोवाडे जुनियर कॉलेज नांदागोमुख आणि तृतीय पारितोषिक कुमारी पूजा केवालजी मुळे सरस्वती महिला महाविद्यालय सावनेर ला मिळाला.
खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक सौ.वेदश्री देशपांडे शिक्षिका जीटीएन कॉलनी खुरजगाव सावनेर,द्वितीय पारितोषिक सौ.माला पारधी शिक्षिका एन.पी.राजेंद्र हायस्कूल, आणि तृतीय पारितोषिक श्री. दर्शन केशव गावंडे तीनखेडा ला मिळाले.
समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष अँड.अभिषेक मुलमुले यांनी युवकांच्या मानसिक व व्यक्तिमत्व विकासासाठी फाउंडेशन नी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन, विद्यार्थी गौरव व कोलार पुनर्जीवन अभियान. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. तुषारजी उमाटे, समर्पण फाउंडेशन सावनेर चे सचिव श्री.कुलभूषण नवधिंगे, उपाध्यक्ष डॉ.नितीन पोटोडे,श्री. अभिषेकसिंह गहरवाल,श्री.विनोद बांगडे,श्री.मंदार मंगळे,श्री. प्रवीणजी नारेकर,नरेंद्र ठाकूर, मनिष चित्तेवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व शाळेतील शिक्षकांचे आभार डॉ.राहुल दाते यांनी मानले.