संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- मकर संक्रांतीच्या निमित्ताने राजुरा तालुक्यातील तुलाना या गावात, खुशी महिला ग्रामसंघ, तथा कृषी अधिकारी कार्यालय राजुरा, उमेद अबुंजा सीमेंट फाऊंडेशन ऊपरवाहि यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदी कुंकू, तसेच महिला शेतकरी मेळावा, व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेबूंरवाहि ग्रामपंचायत चे सरपंच रामकृष्ण मडावी, तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून विरुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निर्मल साहेब हे होते, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीता ताई धोटे मॅडम सामाजिक कार्यकर्ते तथा समाज प्रभोदनकार, कृषी साहाय्यक किल्लारे, परीक्षेत्र अधिकारी आनंदजि बोरुले, दिपक मडावी सामाजिक विचारवंत,कार्यक्रमाचे प्रस्थाविक सतिष साडवे यानी केले, प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. प्राथमिक शाळा तुलाना चे शिक्षक नवले सर, ग्रामपंचायत सदस्य निलंकट राऊत, शुभांगी आत्राम, अनिता वाढंरे, ग्रामसंघा च्या अधक्षा अर्चना भागेवाड, सचिव कुसुम ताई टेकाम, कोषाध्यक्ष तुळजाताई शेलुरकर, अंगणवाडी सेविका नंदाताई मडावी, आशा वर्कर्स हेमलता अलोने हे उपस्थित होते, कार्यक्रम आयोजनाची सर्वस्व जबाबदारी गटाच्या सि. आर. पि भावना मडावी व सोनाली दुबे, सलैश मोरे, कल्याणी तनिरवार, गणपत सोयाम, महादेव बोबडे त्यांच्या टीमने यशस्वी रीत्या पार पाडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिल्ड फॅसीलेटर मयूर मेहुरले यांनी केले, तर आभार प्रदर्शन पल्लवी बोबडे यानी केले,
या कार्यक्रमाचे स्वागत गीत नदांताई गेडाम यांनी गायले, व त्याना तबला वादक मारोती मडावी, पेटी वादक महेश यांनी साथ दिली पाहुण्यांचे आगमन गोंडि नृत्य व लेझीम नृत्यानि करण्यात आले त्यात सहभाग घेतला सुजल मडावी, कृत्तिका मडावी, श्रुती मडावी,काजल केवट, श्रदा मडावी, अक्षता सीडाम , स्वामिनी ऊमक, पुजा मोरे यांनी नृत्य सादर केले, कार्यक्रमा प्रसंगी गटातील महिला व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते