नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धाराशिव:- जिल्हा नियोजन समितीची सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांची प्रारुप आढावा बैठक आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीस जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ चा प्रारूप आराखड्यावर चर्चा झाली.
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शिक्षण, सिंचन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल साठे वाढविणे, जलयुक्त शिवार अभियान, महावितरण, आरोग्य सुविधांसाठी पायाभूत संसाधनांची निर्मिती करणे, रस्त्यांची जोडणी गतिमान करणे, वैद्यकीय महविद्यालयासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी बैठकीदरम्यान केले.
यावेळी सर्व विकास योजनांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यात यावा व पालकमंत्री या नात्याने समन्वयातुन जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिली. या बैठकीस धाराशिव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.