ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपळगाव:- पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव येथील यमुनाबाई महाजन वय 75, यांच्या घरात घुसून आरोपी याने जबरदस्तीने त्यांच्या हातातील 12 ग्रमचे सोन्याचे मंगळसूत्र व 2.5 ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुले दि.20/11/2022 रोजी जबरी चोरी करून नेले होते. त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे गु. र.न.362 /2022 भा. द. वि. 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 16/01/20230 रोजी सदर गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यात आरोपी नझिम बागवान यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील त्याचेकडून चोरी केलेले 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले हस्तगत करण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक गोकुळ सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील , पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348