पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे:- दिनांक १६/०१/२०२३ रोजी मध्यरात्री ००/४५ वा थे सुमारास फिर्यादी हे त्यांचे राहते घरासमोरील मैदानात झोपले असताना त्यांना ठार मारण्याचे उददेशाने ४ इसमांनी हातात तलवार, कोयते अशी प्राणघातक हत्यारे घेवून फिर्यादी यांचेवर खुनी हल्ला करून फिर्यादी यांचे डोक्याचे मध्यभागी तसेच डावे हाताचे दंडावर बार करून त्यांना गंभीर जखमी करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांची पत्नी व मुलगा यांनाही त्यांनी पुढे आल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी दिली होती. यानंतर त्या मारेकन्यांनी त्यांनी (त्यांचेजवळील हत्यारे हवेत फिरवून मोठमोठयाने आरडाओरड करून, दहशत निर्माण करून ते सर्वजण सोबत आणलेल्या दुचाकीवरून पसार झाले होते. याबाबत तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गु. रजि. नं. १७/ २०२३ भा.द.वि. क. ३०७, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) फौजदारी कायदा (सुधारीत) कायदा २०१३ चे कलम ३ व ७ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे व श्री. विक्रम गोड पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पसार झालेल्या मारेकऱ्यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय रित्या माहीती प्राप्त करून सातत्यपूर्ण तपास करून दाखल गुन्ह्यातील मारेकरी अनिकेत ऊर्फे दाद्या लक्ष्मण बगाडे, वय २१ वर्ष, रा. एसआरए बिल्डींग शिदेवस्ती हडपसर पुणे तुषार कैलास काकडे वय १९ वर्षे रा. सदर दिपक ऊर्फ दिपु काकाराम शर्मा वय १९ वर्ष रा. सदर आणि एक विधीसंघर्षितीत बालक यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी करता जुन्या भांडणाच्या कारणांवरून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, मा. सतीश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गोड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत बाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, रोहीत झांबरे यांनी केलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक सचिन तरडे हे करीत आहेत.