नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- गाड्या चोरणार्या दोन जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. ज्या गाड्यां चोरण्यास सोप्या आणि मागणी जास्त त्याच गाड्या हे चोर चोरत असत. त्यांच्या कडून तब्बल १४ लाख ७० हजाराच्या २१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात १० रिक्षा १० स्कुटर आणि एका मोटारसायकलचा समावेश आहे. आलम रफिक खान आणि सलमान शेख असे अटक आरोपींची नावे आहे.
सध्या बाजारात एक्टिव्हा या स्कुटरला मागणी जास्त असल्याने या चोरांनी एक्टिव्हा स्कुटरचे कुलूप तोडून सुरू करण्यात प्राविण्य मिळवले व चोरीला सुरवात केली. सोबतच रिक्षाही चोरी करण्याचे कसब शिकून घेतले. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्शा चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना अभिलेख वरील गुन्हेगार आणि सीसीटीव्हीत चोरी करतानाचे आरोपी याची सांगड घालत असताना त्यांना आलम याची ओळख पटली. त्याचा मागोवा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे, यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले. पथकाने आरोपीचा मागोवा काढायला सुरवात केली आणि आरोपी सुरवयीला आलम याला शिवाजी नगर गोवंडी येथून अटक केली. आलम याने दिलेल्या माहितीनुसार याच परिसरातील बाबर अहेमद गल्लीतून सलमान याला अटक केली. त्यांना अटक केल्यावर त्यांच्या कडून २१ गाड्या जप्त केल्या.