सातत्याशिवाय यशप्राप्ती नाही – यशवंत आंबुलकर आय एफ एस
प्रवीण जगताप, हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट :- प्रत्येकाने आपले सामर्थ्य लक्षात घेऊन त्यानुसार करिअर निवडावे , प्रत्येकाने आपल्यातील उणिवा ओळखावा तसेच आलेल्या संधीचे सोने कसे करता येईल याचा विचार करावा असे मत आय.एफ.एस श्री यशवंत आंबूलकर यांनी आधार फाउंडेशन द्वारा आयोजित करिअर गाईडन्स कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, सुकाणू समितीचे प्रा. डॉ. शरद विहिरकर, प्रा. गजानन जुमडे, प्रा.चंद्रशेखर रेवतकर उपस्थित होते.
करियर निवडताना पार्ट A आणि पार्ट B सुद्धा महत्वाचा आहे. पार्ट A मध्ये यशस्वी न झाल्यास पार्ट B वर फोकस करावे तसेच पार्ट B अयशस्वी झाल्यास पार्ट A वर फोकस करावे. त्यांनी एका महिलेचे उदाहरण देताना बोलले की एक महिला आपल्या करिअरची सुरुवात बँकेत स्विपर म्हणून सुरू करते व नंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन बॅकेत मध्ये मॅनेजर पदावर निवड होते.पुढे बोलताना त्यानी असे म्हटले की प्रत्येकाने आपले सामर्थ्य लक्षात घेऊन करिअर निवडावे, प्रत्येकाने आपल्यातील उणिवा ओळखावा तसेच आलेल्या संधीचे सोने कसे करता येईल यांचा विचार करावा. या सर्व बाबींचा विचार करून येणारे आव्हाने पार करता येते. त्यासाठी दृढनिश्चय, चिकाटी, समर्पन आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त करत यशवंत आंबूलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विद्यार्थाच्या कॅरीअर बाबतच्या शंकाचे निरसन करीत आपल्या प्रवास कथन केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल घिनमिने यांनी केले, प्रास्तविक जगदीश वांदिले तर आभार प्रदर्शन सचिन येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माया चाफले, माधुरी विहीरकर, अनिता गुंडे, सुरेश गुंडे, निखिल ठाकरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.