नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबरनाथ:- अंबरनाथ तालुक्यातील भाल येथील आयडियल महाविद्यालयाच्या बाहेर गुन्हेगार वृत्तीच्या माथेफिरू तरुणाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर धारदार पातेने हल्ला करण्याचा बुधवारी प्रयत्न केला. या विद्यार्थीनीच्या मैत्रिणी मध्ये पडल्या म्हणून विद्यार्थीनी थोडक्यात बचावली. त्यानंतर माथेफिरू तरुण तेथून पळून गेला. तरुणाने तीन वेळा महाविद्यालयाबाहेर येऊन पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीला पळून नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनीने शिताफीने त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. या तरुणाकडून घातक कृती होण्याची भीती असल्याने या विद्यार्थीनीचे पालक दररोज तिला महाविद्यालयात सोडण्यास येत आहेत.
बुधवारी तरुणाने विद्यार्थीनीवर धारदार पातेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हिललाईन पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार केली. पोलिसांकडून कारवाई न झाल्याने गुरुवारी माथेफिरू तरुण पुन्हा महाविद्यालया बाहेर येऊन तरुणीवर हल्ल्याचा किंवा तिला पळून नेण्याचा प्रयत्न केला. इतर विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केल्याने त्याचा प्रयत्न फसला. विद्यार्थ्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली तरी पोलिसांकडून कारवाई झाली नाही. पिडीत मुलगी १५ वर्षाची आहे. ती अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात राहते. मागील वर्षी याच भागात राहत असलेल्या मंगेश सोनावणे या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगेशला अहमदनगर येथून अटक करुन त्याच्या ताब्यातील पीडित मुलीची सुटका केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. तो नऊ महिने तुरुंगात होता. तो अलीकडेच बाहेर आला आहे. पीडित मुलीला तु माझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार का केली. तुझ्यामुळे मला तुरुंगात जावे लागले असे प्रश्न करुन पुन्हा पीडित मुलीला त्रास देत बुधवारी पीडित मुलगी शिकत असलेल्या आयडियल महाविद्यालयाच्या बाहेर आरोपी मंगेश आला. ती महाविद्यालयातून बाहेर येताच तिचा हात पकडून तिला खेचून नेऊन तिला धारदार पातेचा दाखवत होता. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पोलिसांना कळविला.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन मंगेशला ताब्यात घेतले.