नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाण्यात एटीएमच्या बाहेर ठिय्या मांडून पैसे काढणायसाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्या बँक खातेधारकाला विश्वासात घेऊन मदतीच्या बहाण्याने मदत करतानाच त्यांचा पिन नंबरची माहिती घेऊन एटीएमची अदला-बदली करणाऱ्या आणि नंतर बँक खात्यातून लाखोंची रक्कम उडविणाऱ्या चार सराईत आरोपींच्या ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
चारही आरोपी सराईत असून त्यांचा गुन्ह्यांची मोठी मालिकाच असल्याचे समोर आलेले आहे. आरोपीच्या अंगझडतीत विविध बँकेचे १०१ एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि गुन्ह्यातील वाहन असा ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळलेल्या आरोपींमध्ये आरोपी सनी मुन्ना सिंग उर्फ सनी चिकना, श्रीकांत प्रकाश गोडबोले, हरीदास मोहन मगरे, रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ यांचा समावेश आहे. २ जानेवारी रोजी फिर्यादी रुपाली सतिश बोचरे खाजगी कंपनीत कन्सल्टंट करतात. त्यांचे एस.बी.आय बँक मध्ये बचत खाते होते. फिर्यादी महिला नातेवाईकाला ५० हजार रुपये ऑनलाईन प्रणालीने पाठवायचे होते. म्हणून खात्यात पैसे भरण्यासाठी त्या रोड नं २२ जवळ एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये आल्या.=फिर्यादी बोचरे याना ३८,५०० रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सादर गुन्ह्याची गंभीरता पाहून खंडणी विरोधी पथकाने समांतर तपस सुरु केला. सीसीटीव्हीद्वारे संशयितांची माहिती मिळावीत तांत्रिक अभ्यासाने आरोपींची माहिती मिळवली. आरोपी हे पंढरपूर सोलापूर येथे पळुन गेले असल्याची माहीती मिळताच पंढरपूर पोलिसांना संपर्क करीत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या माहितीद्वारे पथकाने उल्हसनगर येथील आरोपी ताब्यात घेतला आणि गोरखधंदा चालविणाऱ्या टोळीचा फर्दाफास झाला. पोलीस पथकाने चार आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची मालिका आरोपी सनी मुन्ना सिंग याच्या विरोधात विविध ९ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. तर आरोपी श्रीकांत प्रकाश गोडबोले उर्फ श्री याच्या विरोधात विविध ९ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत अटक चार आरोपींच्या चौकशीत ८ गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.