नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाण्यातील साकेत परिसरात दोन जण देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या गुन्हे शाखा पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून दोघा परप्रांतीयांना हत्यारासह अटक करण्यात आली. रोहितकुमार दिवाणचंद्र पटेल आणि निखिल बाबुलाल पटेल अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितकुमार हा आणि निखिल हे दोघे दोन देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन घटनास्थळी आले असून पूर्वीच सापळा रचून बसलेल्या पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने या आरोपींची प्राणघातक शस्त्र बाळगल्याच्या पोलिसांना संशय आहे.
आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. या तपासातून अजून काही निघते काय हे बघावे लागेल.