माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंदाचे विचारच राष्ट्राला समर्थ बनवू शकते: प्रा. डॉ. शरद विहीरकर
प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माँ. जिजाऊ यांची स्वराज्य निर्मितीसाठी असलेली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज व राजे छत्रपती संभाजीच्या महाराज याच्या जडणघडणीमध्ये जिजा मातेचे मोलाचे योगदान आहे म्हणूनच त्यांच्या विचाराची शक्ति ही राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद विहीरकर यांनी केले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर प्रकाश टाकताना स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेत हिंदू धर्माचे महत्त्व सांगताना सर्वधर्मसमभावाची आवश्यकता असून धर्म मानवाला जगण्याचे सामर्थ्य शिकवते आज देशातील तरुणांना विवेकानंद हे रोल मॉडेल मानून आपली प्रगती करून राष्ट्रनिर्मिती साठी योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले. ते स्थानिक रा.सू. बिडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. बी. एम.राजुरकर होते, प्रमुख उपस्थिती आय. क्यु सी समन्वयक प्रा.डॉ.शरद विहीरकर, इतिहास विभाग प्रमुख डॉ.ए.सी. बाभळे, डॉ. जी.बी. ठक, प्रा.डॉ.आर.डी. निखाडे, प्रा.डॉ. एम.के. तेलंग, डॉ.लेफ्ट.आर.एम. भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. ए. सी. बाभळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्त्रियांना गुलामगिरीतून, अनिष्ट प्रथेतून मुक्त करून स्त्रियांमध्ये स्वाभिमानाची जागृती निर्माण केली असे विचार त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रा. जी.बी. ठक यांनी सुद्धा विवेकानंदाचे विचार देशाला किती आवश्यक आहे हे सांगीतले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बी. एम. राजुरकर यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रकाश टाकला आणि या विचारांची कशी आवश्यकता आहे हे सांगीतले म्हणून युवकांनी विचारात बदल घडवून आणावा तरच सशक्त राष्ट्राची निर्मिती शक्य होईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल पिपरे त्यांनी तर आभार अंकित वानखेडे यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला राष्ट्रीय योजनेतील महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.