🖊️आशिष अंबादे , वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
वर्धा, दि.6:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व मद्य विक्री विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईत एकुण 185 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 92 वारसगुन्ह्यामध्ये 91 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 6 वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी कडून 40 लाख 85 हजार 24 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक निरिक्षक, तीन दुय्यम निरीक्षक, एक सहाय्यक दुय्यम निरिक्षक, सहा जवान व एक वाहन चालक असा तोकडा कर्मचारी वर्ग असतांनाही विभागाच्यावतीने सदर अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री करणाऱ्या विरुध्द कारवाई करण्यात आली.
वर्धा जिल्हात नागरिकांनी त्यांच्या परिसरात होत असलेल्या अवैद्य भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 180023339999 टोल फ्री व 8422001133 या राज्यस्तरीय व्हॉट्स ॲप क्रमांकावर किंवा 07152-240163 या जिल्हास्तरीय अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.