भीम आर्मी आणि अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटनाने केले नेतृत्व.
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गडचांदुर:- प्रसिद्ध CCR ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बिबी येथील कार्यालयच्या गेट समोर भीम आर्मी आणि अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटना तर्फे कंपनीच्या वाहन चालकांनी मागील पाच महिन्यापासून पगार न मिळाल्याने एक दिवसीय आक्रोश आंदोलन करण्यात आले.
सीसीआर कंपनीच्या वाहन चालकांना मागील पाच महिन्यापासून वेतन मिळालेले नाही, त्यामुळे या वाहन चालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलाबाळांची तर सोडा दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे सुद्धा कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत न्याय हक्कासाठी नियोजित पणे पद्धतीने भीम आर्मी व अनिशा वाहन संघटनाच्या नेतृत्वात वाहन चालक आंदोलन करीत आहे. यापूर्वी सुद्धा गोवरी डीप समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते, परंतु कंपनीतर्फे कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्या धरण्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत राजुरा येथे एक बैठक घेण्यात आली परंतु त्या बैठकीत आश्वासन दिल्यानंतरही वाहन चालकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे वाहनचालकांनी 2 ऑगस्ट ला सीसीआर कंपनीच्या बीबी कार्यालयाच्या गेट समोर कंपनी प्रशासन मुर्दाबाद चे घोषणा देत आक्रोश आंदोलन करण्यात आले.
वाहन चालकांना जोपर्यंत कामाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी जाहीर घोषणा भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपूरे, सुरज उपरे, भीम आर्मी जिल्हा उपप्रमुख तथा अनैशा वाहन चालक व इतर कामगार संघटना अध्यक्ष, राजु सोदारी भीम आर्मी जिल्हा संघटक यांनी केले.
या आंदोलनात अनिल चीलमुले, सत्यपाल गौरकर, तोफिक शेख, रियाज शेख, संजय कोयलवर, विकास माऊलीकर, गणेश देवी, विक्रम रंगारी, सुनील सेरकुरे, सुमित सपडी, एकनाथ नेहारे, अमीर शेख, सुनील वाघमारे, सुनील वाघोसे, गोविंदा वाघमारे, दिपरत्न उपरे, शंकर गेडाम, अमरजित सिंह, पपू सिंह व अन्य वाहन चालक उपस्थित होते.