नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मधील धारावीमधून एक खळबजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीची पोटात धारधार चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ९० फूट रोडवर ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जाहिद असे असून ते आपल्या पत्नीसोबत एका ठिकाणी जात होते. यावेळी दोन जण पाठीमागून आले आणि त्यांनी थेट जाहिद यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केले. या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवेळी मृत व्यक्तीची पत्नी देखील त्यांच्या सोबत होती. त्यामुळे त्यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. जिवाच्या अकांताने त्या आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपतार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जाहिद हे सेक्युरिटी म्हणून काम करत होते. मृतक आपल्या पत्नीसह 90 फूट रोडवरून ते आपल्या दुचाकीने जात असताना त्यांचे वाहन थांबवून त्यांच्यावर चाकूने वार केले गेले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला असे, धारावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आरोपीं विरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.