✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय युवा संस्कार परीषद व भारतीय बहुउद्देशिय युवा संस्कार मंडळ द्वारे मागील २३ वर्षापासून सामाजिक कार्यात रचनात्मक, प्रबोधनात्मक, मानवी जीवनासह सर्व जीवांचे उत्थानासाठी तथा वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करीत असलेल्या व्यक्ती तथा संस्थेला स्व. रमेशकुमार विश्वनाथ गोयनका जिल्हा गौरव युवा संकल्प सेवाभाव पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. सन २०२३ चा संकल्पमय हा पुरस्कार वर्धा येथील गांधी विचार चळवळीचे कार्यकर्ते तथा भुतदया प्राणी, पशुपक्षी यांचे हक्क अबाधित राखीत सेवामय कार्य करणारे भुतदयावादी आशिष नारायणगिरी गोस्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार सुरेश वाघमारे, तर प्रमुख अतिथि माजी महापौर दयाशंकर तिवारी नागपुर, प्रेम बसंतानी, हाजी मोहम्मद रफीक, परीषदेचे संरक्षक अजय महाजन, भा.बहु.युवा सं.मंडळाचे संस्थापक सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, रविन्द्र गोयनका, गौरवमुर्ती आशिष गोस्वामी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
गुणवंत अभ्यासिका, गुरुदेव लाँन सभागृह, नँशनल हायवे रोड येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. प्रारंभी राजमाता आई जिजाऊ, स्वामी विवेकानंद, स्व. रमेशकुमार गोयनका, यांचे प्रतिमेचे पुजन करुन प्रमुख मान्यवरांनी दीप प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलतांना सुरेश वाघमारे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचा विचार तथा आई जिजाऊ यांचा सर्व सामान्य लोकांच्या उन्नतीसह भुतदयावादी मुक प्राण्याची सेवामय कार्याने तुम्ही जगा आणी इतरांनाही जगू द्या हा भाव मनुष्यांत निर्माण करणारे आशिष गोस्वामी यांना स्व. रमेशकुमार गोयनका पुरस्कार देणे हे संयुक्तिक ठरते असे मत वाघमारे यांनी व्यक्त केले. प्रसंगावश दयाशंकर तिवारी, प्रेम बसंतांनी, हाजी मोहम्मद रफीक, यांनी विचार प्रगट केले तर सत्कारामय बोलताना आशिष गोस्वामी म्हणाले की हल्ली पुरस्कार जाहीर करुन पैसे उकळणा-या संस्था आहेत पण भारतीय युवा संस्कार परीषद कोणतेही प्रस्ताव न मागता ख-या अर्थाने मागील २३ वर्षापासून ह्या पुरस्कारात रोख रक्कम, शाल-श्रीफळ, मानपत्र, परीषद गौरवचिन्ह, स्व. गोयनका स्मृती पुरस्कार चिन्ह आदी देऊन गौरव करण्यात आल्याने आमचे संस्थेचे कार्य पाहून, मला अधिक गतीने कार्य करण्याची जाणीव करुन देत जनता-जनार्धानाचे साहय्याने हे कार्य निरंतर सुरु राहिल हीच प्रेरणादायी बळकटी प्राप्त झाली आहे, केलेल्या कार्याची हीच खरी पावती आहे असे मनोगत केले.
या समारंभाचे प्रास्ताविक संस्था सचिव प्रदीपकुमार नागपुरकर यांनी तर सूत्रसंचालन अमोल भोमले यांनी तर आभार प्रदर्शन विशाल घाटुर्ले यांनी केले. यावेळी शहरातील गांधीवादी सर्वोदयी रमेशचंद्र झाडे, हभप रघाटाटे महाराज, वरघणे महाराज, पी.व्ही.टेक्सटाइलचे मँनेजर भुपेंद्र शहाणे, प्रा. ज्ञानेश्वर खडसे, प्रा. जितेंद्र केदार, प्रा. अशोक बोंगिरवार, लोक साहित्य परीषदेचे ज्ञानेश्वर चौधरी, भगवानदास राठी, पत्रकार सतिश वखरे, नरेन्द्र हाडके, रवि येनोरकर, तारामावशी बगमारे, धर्मेंद्र ढगे, सौ. संतोषी ढगे, कु.कनिज फातेमा, कु. वैष्णवी बुरांडे, नेत्रा आंबटकर, प्रिती पवन चव्हाण, मायाताई ढगे, अंकुश बावणे, रवि धनकर, नितीन सिंगरु, मोहम्मद नइम मलक, नरहरि थुल, रामजी मेंढे, समाजसेवी दिनेश वर्मा, राकेश झाडे, आदीसह अनेक गणमान्य उपस्थित होते.