नागरिकांशी सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबवा: विशाल सरवदे, सचिव स्वराज्यवादी बहुजन महासंघ
वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन केज:- तालुक्यातील साळेगाव येथील वार्ड क्र. ३ मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी नालीवर गवत व इतर वनस्पती उगवलेल्या असून नाल्या देखील तुंबलेल्या आहेत यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून डेंगू मलेरिया सदृश्य आजारामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. त्यामुळे साळेगाव येथे स्वच्छ भारत अभियानाचा बटाबोळ झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
आज केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ भारत अभियान चालवत आहे. तर दुसरीकडे या अभियानाला काळे फासले जात असल्याचे चित्र केज तालुक्यातील साळेगाव येथे दिसून येत आहे. येथील वार्ड क्र. ३ येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील ग्रामपंचायत स्वच्छता करण्यास असमर्थ व उदासीन असल्यामुळे ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नाली स्वच्छता नसल्यामुळे नालया तुंबल्या असून. नाली वरती गवत व इतर वनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे मच्छरांचा मोठा प्रादुर्भाव वाढला असून येथील नागरिकांना डेंगू, मलेरिया, हिवताप अशा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तरी याची सविस्तर चौकशी करून गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांनी संबंधित अधिकारी, सरपंच यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व वार्ड क्र.३ मधील सर्व नालीसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अशा याची तक्रार विशाल जयद्रथ सरवदे, सचिव स्वराज्यवादी बहुजन महासंघ यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांच्याकडे केली आहे.