यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी दहिसर पूर्व ते डी.एन.नगर दरम्यानच्या १८.०६ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २अ आणि अंधेरी पूर्व आणि दहिसर यांना जोडणाऱ्या १६.०५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ७ या मार्गांचा यात समावेश आहे. या मेट्रो मार्गांवरील गुंदवली स्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाले. तसेच त्यांनी या मेट्रो स्थानकाची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मेट्रो मार्गाचा उपयोग होणार आहे.
त्यासोबतच मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुंबई१ ऍपचे आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण देखील याप्रसंगी करण्यात आले. हे कार्ड मेट्रोसाठी वापरता येणार असले तरीही भविष्यात रेल्वे आणि बसचा प्रवास देखील याच कार्डद्वारे तिकीट काढून करता येणे शक्य होणार आहे.
यासमयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि एमएमआरडीएचे आयुक्त एस.सी.आर.श्रीनिवास उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348