नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- रुणाली पवार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात ८ वा क्रमांक मिळावुन दिवाणी न्यायाधीश (जज) पदावर नियुक्ती झाल्या.
रुणाली चे वडील दयानंद पांडुरंग पवार व आई सौ. रंजना दयानंद पवार हे भिवंडी तालुक्यातील खंबाळा गावात किराणाचे दुकान चालवतात. आपलं शिक्षण कमी असले तरी मुलांना चंगले शिक्षण देण्याची त्यांचे मनापासून इच्छा होती म्हणुनच त्यानी कल्याण येथे मोहिंदर सिंग इग्लिश हाईस्कुल मध्ये ऍडमिशन घेउन तिचे आजोबा श्री.महादेव कराळे व श्री.रामचंद्र पष्टे यांच्या घरी राहुन १० वी पर्यंत शाळेय व १२ पर्यंत बिर्ला काॅलेज येथे शिक्षण पुर्ण केले.
त्यानंतर तिने आपले एल.एल.बी चे शिक्षण मुंबई येथिल गव्हार्मेट लाॅ काॅलेज मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पुर्ण केले. नंतर पुढील शिक्षणासाठी तिने पुणे येथे हॉस्टेल वर राहून पुर्ण केले. ह्या शैक्षणिक प्रवासात तिला तिच्या आई- वडील, आजी-आजोबा, मावशी व मामा-मामी, भाऊ बहिणी व मित्र परिवाराची मोलाची साथ मिळाली.
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून तिने मेहनत घेतली व महाराष्ट्र राज्यात 8 व्या क्रमांक मिळावुन यश मिळवले. रुणाली यांनी मिळालेल्या यशामुळे पंचक्रोशीतील नागरिकांन कडुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, रुणाली यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील मुलींना व विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

