माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी खमनचेरू अहेरी रोडच्या कामाची पाहणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत खमनचेरु ते अहेरी हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात विकास कधी होणार तरी अहेरी खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. सीएमजीएसवाय च्या अधिकाऱ्यांनी या रोडचे काम सुरु करून जनतेची मागणी पूर्ण करायला तयार असतांना वनवीभागाचे काही कर्मचारीयांनी या कामात आडकाटी टाकून रोकून धरले होते.
त्यामुळे अहेरी येथील माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यानी वन अधिकारी डीएफओ साहेबांना या बाबद विचारणा केली असता अहेरी खमनचेरू रोड चे काही भाग वनविभागाच्या अखात्यात येत असल्याने वन विभागाने काम रोखले अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु होती. जो रोड मागील पन्नास वर्षांपासून असून अचानक पणे वन विभाच्या अख्त्यांरीत कसे काय? आले असा प्रश्न जनता करीत आहे.जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्या पलीकडचे आहे. जनता हि वेळो वेळी वनविभागाला मदत करत असते मात्र वन विभाग मात्र जनेतेचे काम होऊ देत नव्हते पण डीएफओ टोलिया साहेबांशी चर्चा केल्यावर वन विभागाने हिरवी झेंडी दाखविली आणि आज पासून कामाला सुरुवात.
यावेळी उपस्थित कु.सुनीता कुसनाके माजी जि. प.सदस्य, अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी होते.