विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन श्रीरामपूर. दि:20:- गेल्या काही वर्षापासून ख्रिस्ती समाजावरती आणि धर्मगुरू वरती मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत सर्वजण सलोख्याने राहत असताना काही गुंड प्रवृत्तीचे लोक समाजात विष कालवत सर्वधर्म समभावाला काळीमा फासण्याचे काम करत आहे.
श्रीरामपूर येथील चर्च आणि ख्रिती समाजावर काही सामाजिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अन्याय अत्याचार करण्यात आला होता. त्यामुळे ख्रिती समाजाच्या नागरिकात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यात त्यांचे धर्म आचरण आणि प्रार्थना करण्याच्या घटनात्मक अधिकार याला पण पायाखाली तुडवत महिलाना अश्लिल शिव्या देऊन त्यांना अपमानित करण्यात आले होते त्या विरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथील समत्र ख्रीती समाजाच्या नागरिकांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात असे लीहले आहे की, सबब आंदोलनांबाबत दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार श्रीरामपूर आणि पोलीस प्रशासनास कळविण्यात आले. आमचा विश्वास न्यायसंस्थेवर आहे आणि पोलीस प्रशासन आमचे मित्र म्हणून नेहमीच संबोधीत करतो. परंतु चर्च सारख्या धार्मिक स्थळाबाबत आत्ता जी अपवित्र भूमिका बाळगती गेली ती अत्यंत निंदनीय आहे. अशा अधार्मिक आणि अन्यायाबद्दत श्रीरामपूर फेथ ए. जी. चर्चचे स्थानिक नागरिक पाळक आणि संस्थेच्या लोकांनी त्यांच्यावर कोणत्या प्रकारे अन्याय झाला आहे. याबाबत आमच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आबेडकरगट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे कळविले असता त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे स्थानिक पोलीस आयुक्त आणि प्रशासनाला पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांद्वारा वेळोवेळी कळविण्यात आले.
परंतु अगदी सणाच्या दिवशी मागील 13 एप्रित 2022 रोजी गुडफ्रायडेच्या दिवाशी चर्चला कुलूप लावण्यात आले आणि 2023 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बंडखोर व्यक्तींनी श्रीरामपूर येथील भारतीय नागरिकांची घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करून लोकांना प्रार्थनेच्या अधिकारापासून वंचित करून त्यांना उपासना करण्यास मज्जाव करणे आणि गुंडाद्वारे स्त्रियांना लज्जास्पद वागणूक देणे इत्यादी निंदनीय प्रकार सतत चालू राहिले आणि आत्तापर्यन्त त्याची कोणतीच दखल घेतली नाही. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे ह्यांनी दखल घेऊन सबब आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात आली. आम्ही बाबासाहेबांच्या विचारसरणीचे आणि घटनेचा सन्मान करणारे असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस पोलिस प्रशासनाला निवेदनाद्वारे आणि विविध तक्रारीद्वारे कल्पना दिली असून न्यायप्रविष्ट प्रकरणाची कल्पना दिलेली आहे. सबब प्रकरण हे धर्मादाय आयुक्तांच्या कार्यकक्षेत असून त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणे हे चुकीचे असून आमच्या मागण्या येणेप्रमाणे आहेत:-
1) चर्चमध्ये जाण्याच्या भक्ती करण्याच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवल्याबाबत संस्थेच्या लोकांनविरुद्ध घटनेचा अपमान करणे आणि घटनेतीत अनुच्छेद कलम 25 विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचे आचरण आणि प्रचार. अनुच्छेद २६: धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य ह्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत.
2) बेकायदेशीर संस्थेच्या लोकांनी स्थानिक स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींना ढकलून देणे, अश्लील भाषा वापरणे आणि लज्जास्पद वर्तन करतानाचे निवेदन देऊनही कोणालाही अटक नाही किंवा कोणतीही दखत नाही करिता मंडळीतीत स्त्रिया आई बहिणींसोबत लजास्पद वर्तणाबद्दत गुंडांना अटक करावी.
3) बनावट कागदपत्राद्वारे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याद्वारे पोलिस प्रशासनाची दिशाभूल आणि स्थानिक ख्रिस्ती मंडळींवर अन्याय, गुंडागर्दी करणान्याना पोलिसप्रशासनाद्वारे अभय देऊ नये.
4) साऊथ इंडिया असेम्ब्लीज ऑफ गॉड संस्थेचे अधिकारी बनावट आहेत कि काय ह्याची चौकशी करून त्यांची कसलीही नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात आहे काय पोलीस प्रशासनाने त्यांच्या अधिकारांची आणि संस्थेच्या सत्यतेची पडताळणी करावी आणि फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा.
5) सध्याचे धर्मगुरू पास्टर सचिन चक्रनारायण हे स्थानिक मंडळीने सन २०१३ पासून धर्मगुरू असून धर्मगुरूविरुद्ध चर्चमधील वास्तव्यास असताना त्यांच्या विरुद्ध लावलेता कलम 447 अन्वये अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला आहे तो रद्द करावा. 6) साऊथ इंडियासेज ऑफ गॉड संस्थेच्या अधिकार्याना घटनास्पद कोणते अधिकार आहेत काय? मान्यताप्राप्त आहे काय आणि ह्या लोकांच्या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी आहे का? त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे कोणतेही नियुक्तीचे अधिकारपत्र आहेत का? सबब संस्था हि कार्यालय मुंबईद्वारे कोणती मान्यता आहे का ? अशी कागदपत्रांची आणि अधिकारपत्राची सरकारी संस्थेद्वारे पडताळणी करून शहनिशा व्हावी.
7) तसेच सबब प्रॉपर्टी संदर्भात ह्या लोकांचे अनाधिकृतपणे धार्मिक क्षेत्रावर ताबा मिळवून विकणे किंवा त्याची विल्लेवाट लावणे इत्यादीप्रकारे कोणते षडयंत्र आहे किंवा काय ? सबब संस्थेद्वारे धर्मान्तरासारखे कोणते घातक उपक्रम राबविण्यासाठी मुंबई येथील विवेक दिडोरकर नामे व्यक्तीची आणि त्यांच्या सहकार्याची आणि ज्यांना ज्यांना त्यांच्याद्वारे पैसा आणि वस्तू पुरविता जातो ह्याची सखोल चौकशी सी. आय. डी. यंत्रणेद्वारे व्हावी.
8) स्थानिक फेथ असेम्बलीज ऑफ गॉड संस्थेच्या सर्व माता भगिनी, वृद्ध भगिनी आणि नागरिकांना रविवार किंवा कोणत्याही धार्मिक विधीकरिता चर्चमध्ये जाण्यास भक्ती करण्यास मज्जाव होईल किंवा कोणतेही घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवू नये ह्या करिता योग्य ती शासकीय खबरदारी घ्यावी.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348