विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इ. 11 व 12 वी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी ए सूर्यवंशी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर अभ्यासपुरक उपक्रम आवश्यक असतात, त्यातून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी कळतात व तशा संधी त्यांना उपलब्ध करून देता येतात. तसेच त्यांनी आपल्या सुरेल आवाजात एक गीत सादर करून विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. एस हळपे यांनी केले व ‘हर घर तिरंगा’ बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इ 12वी च्या विद्यार्थीनी रिया पाटील, आदिती पाटील, निकिता बाविस्कर, वैभवी पाटील, सलोनी पटाईत, चैताली पाटील, कमलेश वानखेडे, सोनल गोहिल, हर्षल पाटील, भगवान बडगुजर, कमलेश वानखेडे व निकिता बाविस्कर विविध कलाप्रकार सादर केले.
त्याचप्रमाणे प्रा.आर आर बडगुजर, प्रा. अतुल पाटील, प्रा. एन बी शिरसाठ प्रा.भुषण पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील, प्रा. पी एस पाडवी, समन्वयक प्रा. ए एन बोरसे, प्रा. टी एस पिंजारी, डाॕ डी ए तायडे ,प्रा एस आर पाटील, प्रा. पी व्ही पाटील, प्रा. आर आर पवार, प्रा. एस एस जैनप्रा, जयेश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी इ. 11 वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपाली पाटील व प्रा शिरीन सैय्यद यांनी केले तर आभार प्रा अतुल पाटील सर यांनी मानले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.