पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गून्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे :- शहरामध्ये दिवसेंदिवस सराफ दुकानामध्ये दागिने खरेदी करण्याचे बहाण्याने सराफ दुकानदाराची नजर चुकवून सोन्या-चांदीचे दागिने चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने, आशा चोऱ्या करणारे रेकॉर्डवरील महिला गुन्हेगारावर पाळत ठेवण्या बाबत मा. रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी आदेश दिले होते. त्याअनुषाने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १३६/२०२३ भा.द.वि. कलम ३८० या गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने युनिट-२ प्रभारी वपोनि श्री क्रांतीकुमार पाटील सो यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे व Unit-2 कडील एक स्वतंत्र टिम तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यानंतर युनिट-२ कडील पोलीस अमंलदार गजानन सोनुने व उज्वल मोकाशी यांनी दाखल गुन्हयाचे ठिकाणी जावुन, शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासुन, गुन्ह्यात वापरलेली रिक्षाचा आर.टी.ओ. नंबर प्राप्त करुन, सदर रिक्षा चालकास ताब्यात घेवुन, त्याकडे सखोल तपास केला असता, त्याचे संपर्कातील नेहमीचे ग्राहक महिला उषा रिटे व संगिता रिटे रा. विठ्ठल नगर, वारजे पुणे असे असल्याचे निष्पन्न होताच. सदरच्या महिला ह्या नटराज हॉटेल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता वरील स्टाफच्या मदतीने सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेवुन त्यांचे नाव १) उषा दत्ता रिटे वय ४५ वर्षे, रा. विठ्ठल नगर, वारजे पुणे २) संगिता प्रकाश रिटे वय ५० वर्षे, रा. सदर असे आहे. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असता, त्यांना दाखल गुन्हयात दिनांक २०/०१/२०२३ रोजी १६/३० वाजता अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अटकेत त्यांचेताब्यातुन दाखल गुन्हयातील ४०,०००/- रु किमंतीची ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असुन, पुणे शहरामधील इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-२ करीत आहे.
सदर महिला ह्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असुन, त्यांचेवर आज तागायत बरेच गुन्हे दाखल आहे. या महिला रिक्षाने सराफ दुकाणामध्ये ग्राहक म्हणुन जातात व सराफाची नजर चुकवून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करतात
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णीक, अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अमलंदार उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, रेश्मा उकरडे, साधना ताम्हाणे, विनोद चव्हाण, उत्तम तारु, मोहसिन शेख, शंकर नेवसे, निखील जाधव, गणेश थोरात, नागनाथ राख, समिर पटेल, कादीर शेख, यांनी केली आहे..