✒️प्रविण जगताप, हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
मो. 9284981757
हिंगणघाट,दि.06ऑगस्ट:- पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे विद्युत महावितरण कंपनीच्या कंत्राटदाने तक्रार दिली कि, दाभा गावात व शिवारात इलेक्ट्रीक पोलचे तार पडलेले होते, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.होता सदर गुन्हा दाखल होताच पो.स्टे. हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे पोलिस हवालदार शेखर डोंगरे यांचे पथकास सदर गुन्हयाचा तपास सोपविण्यात आला. त्यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी मोहम्मद एजाज मोहम्मद अख्तर वय 24 वर्षे रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यास ताब्यात घेवुन अटक करून, त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला इलेक्ट्रीक पोलवरील तार व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुन 50,000 रू. चा माल जप्त केला व २४ तासाचे आत गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कामगीरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर,गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, पोशि भुषण भोयर यांनी केली आहे.