यावेळी अखिल भारतीय सेनेचे आशा अरुण गवळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. शेकडो महिलाची उपस्थिती.
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नात्यातील गोडवा आणि आपुलकी वाढवणारा सण म्हणजे मकर संक्रांती..! हळदी-कुंकवाच्या निमित्ताने विशेषतः महिलांसाठी खास असणारा सण. त्यानिमित्ताने भायखळा दगडी चाळ येथे अखिल भारतीय सेना तर्फे आशा अरुण गवळी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व सौभाग्यवतीच लेणं असणारं वाण देण्यात आले व महिलांसाठी विशेष डोंगरी चाळ प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विजेत्या संघास पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
शरिराचे आणि मनाचे आरोग्य जपणारी संस्कृती किती महान आहे. धावपळीच्या जीवनात जो तो व्यस्तच आहे, निमित्तादीक का होईना पण भेटीगाठी घेऊन, अबोला, द्वेषमत्सर, अहंकार सोडून संवाद साधण्याची सणावार, उत्सवांची वेगळीच मौज आहे. धावपळीच्या युगामध्ये, नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही आम्ही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्षही जोडलेलो आहोत. विज्ञानाच्या युगामध्ये भौतिक प्रगती गरजेची आहे पण आनंदाने जगण्यासाठी आपुलकीची नातीही तितकीच महत्वाची आहेत. यंत्रासोबत जगताना रोबोटचीही निर्मिती झाली, हुबेहुब फुलेच पण सुगंध नाही, माणसेही कृत्रिम असावीत अशीच जाणीव व्हायला लागली. आभासी या विश्वातून बाहेर येणे गरजेचे आहे. नातीगोती, मैत्री, सामाजिक, सांस्कृतिक, कलाक्रिडा स्तरावर प्रेमाच्या धाग्याची आज सर्वांनाच गरज आहे. अनमोल मनुष्य जन्म पुन्हा भेटणार नाही. बालपणापासून भेटलेले अनेक नाती, मैत्री, सवंगडी नकळतपणे काही स्थलांतरामुळे, काही काळाच्या मूखात गडपही झाली. आपणही एक दिवस देह ठेवणारच आहोत पण त्याआधी भरभरुन जगता आले पाहीजे. निसर्ग नियमांचे पालन करुन विषय वासनेला बळी न पडता आनंदी जीवनाचा उपभोग घेतलाच पाहीजे. पण सोबत कोणी काहीच नेले नाही याचा विचार करुन तारतम्यही सांभाळता आलेच पाहीजे. जन्मताच व कर्मधर्मामुळे मिळालेली नाती, ओळख जपायलाच हवी कारण बाकी जगासाठी तर आपण अनोळखीच आहोत. माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील मनापासून माफी मागतो, मनातील भावरुपी गोडव्याचे तिळगुळ या शब्दसुमनांच्या रुपाने आपल्याला पाठवत आहे असे मत या वेळी समाजसेविका आशा अरुण गवळी यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन आनंद व्यक्त केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348