शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी या नगर परिषदेच्यात आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सोडत पध्दगतीने निश्चित करण्यात आली आहे. राज्या निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार वरील नगर परिषदांची आरक्षण सोडत दिनांक २९ जुलै २०२२ रोजी प्रसिध्दव करण्यायत आली. त्याानुसार दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत महाराष्ट्रन नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम -१९६५ मधिल कलम १० नुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यारत आल्या२ होत्यां. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, अमरावती यांची नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी ची सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणास अंतिम मान्याता मिळालेली आहे. नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी च्याि सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणाची अंतिम अधिसुचना संबंधित नगर परिषद कार्यालयाचे सुचना फलकावर व वेबसाईटवर तसेच जिल्हााधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर व yavatmal.gov.in या वेबसाईटवर दिनांक ०५ ऑगस्ट. २०२२ रोजी प्रसिध्दल करण्याुत येत आहे, असे जिल्हासधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.