✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला धक्का देवून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे बाळासाहेब थोरात यांची चांगलीच गोची झाली.
दुसरीकडे नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार याची तारीखच जाहीर केली आहे. पटोले यांनी येत्या १४ फेब्रुवारीला हे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणीच केली आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारावेळा नाना पटोले बोलत होते. यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रचारा दरम्यान नितीन देशमुख यांनी ही सरकार कोसळेल असा दावा केला आहे. ते म्हणाले सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ‘सर्वोच्च न्यायालय निकाल देईल. त्यावेळी १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल असा दावा त्यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखीन भविष्यवाणी केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की.