डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता.20 दरोडा टाकून चोऱ्या करणाऱ्यां सराईत चोरट्यांच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट- ३ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या
पथकाने एकुण ५ आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून १२ सोनसाखळी, चोराची वाहने, ०२ पिस्टल, २२ जिवंत काडतुसे, ०१लाखाची रोकड, ४३० ग्राम सोन्याची दागिने असा एकुण २५ लाख २७हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये अमर हरिदास दहातोंडे वय २०,रा.वडाळा, ता. नेवासा, जि, अहमदनगर, सध्या रा, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, यशवंत जाधव याच्या खोलीमध्ये ता. खेड जि, पुणे, अनिल गोरखनाथ म्हस्के वय ३०, रा. चिबंळी फाटा, यशवंत जाधव यांच्या खोलीत मूळ रा, समतानगर ता. पनवेल, जि. रायगड, राजू शिवशंकर यादव वय ४२ रा, तळेगाव दाभाडे गणपती चौक ता, मावळ, जि पुणे, मूळगाव शहारा ता, लोणार , जि बुलढाणा, सोपान ढवळे, प्रशांत राजू काकडे वय ३० रा, तळेगाव दाभाडे गणपती चौक ता, मावळ जि, पुणे अशी आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार तारीख 10 रोजी दुपारी दरोडा टाकली असल्याची घटना घडली होती दिवसाढवळ्या पडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीन चे पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असताना पथकातील पोलीस हवालदार विठ्ठल सानप पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सापळा रचून पुण्यातील पाचही आरोपींना अटक केले
या गुन्ह्यातील आरोपी राजू यादव आणि अनिल मस्के हे सराईत गुन्हेगार आहेत आरोपी राजू यादव हा अलिबाग पोलीस ठाणे दरोडेच्या गुन्ह्यात आठ वर्षे तुरुंगात राहुन मोठ्या गुन्ह्यातून सन २०२०मध्ये जामीनवर सुटला आहे तर आरोपी अनिल म्हसके हा पनवेल पोलीस ठाणे नोंद असलेल्या खुनासारख्या गंभीर पुण्यातील आरोपी आहे सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
आरोपी राजू यादव आणि आरोपी सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा होता पैसा मिळवण्यासाठी ते तळेगाव परिसर फिरत असताना त्यांचे लक्ष एका गुटखा व्यापाऱ्याच्या कडे गेले गुटखा व्यापाऱ्याने त्याच्या घरात भरपूर काळा पैसा दडवून ठेवला असल्याची माहिती या आरोपींना मिळाली होती त्यानुसार नियोजन करून आरोपींनी मिळून दरोडा टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे तसेच आरोपी अनिल मस्के आणि अमर दहातोंडे यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आळंदी, दिघी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परिसरात एकूण बारा सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले झाले आहे. त्यांच्याकडून एकूण १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत अशा प्रकारे आरोपीकडून एकूण २५ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे ,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड ,उपनिरीक्षक गिरीश चामले, अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनुमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, महेश भालचिम, विठ्ठल सानप, समीर काळे, निखिल फापाळे, शशिकांत नांगरे ,रामदास मेरगळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.