✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड, 22 जानेवारी:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलांचा फायदा घेऊन एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. तुला एक एकर जमीन देतो, तुझ्यासह तीन मुलांनाही सांभाळतो’, असे सांगून नराधमाने अत्याचार केले ‘तुला आयुष्यभर सांभाळतो, तुझ्या मुलांचेही संगोपन करतो’ असे सांगून एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या पिंपळनेर ठाणे हद्दीत समोर आली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर पंडित लांडे रा. घाटसावळी, ता. बीड असं आरोपीचं नाव आहे. आरोपही परमेश्वर लांडे हा अविवाहित असून त्याची गावात रोपवाटिका आहे. तिथं कामाला येणारा 26 वर्षीय विवाहितेशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
यातून 2018 पासून त्याने तिच्यावर अत्याचार केला. ‘तुला एक एकर जमीन देतो, तुझ्यासह तीन मुलांनाही सांभाळतो’, असे सांगून त्याने कुकर्म केले. पीडितेनं जेव्हा त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने नकार दिला.
एवढंच नाहीतर जमीन देण्यास आणि सांभाळ करण्यास सुद्धा नकार दिला. त्यामुळे संतपलेल्या पीडितेने पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्याकडे कैफियत मांडली. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी परमेश्वर लांडेविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एस.टी महामंडळ अंतर्गत धक्कादायक घटना समोर आली आहे. एस.टी चालकाने प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी गंगापूर आगारातील एस.टी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या इतर दोन नातेवाईकांविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच एस.टी चालक आरोपी संदिप गंडे याला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा गंगापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.