🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चंद्रपूर जील्हातील भद्रावती येथील आश्रम शाळेत अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज मोठ्या प्रमाणात मुली आणि महिलेवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. शाळे सारख्या पवित्र स्थिकानी अगर असे अत्याचार होत असेल तर महिला आणि मुली कुठे सुरक्षित राहणार असे प्रश्न आज पालकांना पडत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही भद्ररावती येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत होती, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, जेव्हा ही संतापजनक घटना समोर आली त्यावेळी संपूर्ण वर्धा जिल्हा हादळला आहे.
घटनेची गांभीर्य बघत वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी रूग्णालयात जाऊन पिढीत मुलीची भेट घेतली. आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून कडक शासन होण्याकरीता प्रयत्न करण्याच्या सुचना केल्यात व पिडीतेला शासकीय योजनेतून मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचे निर्देश दिले त्याचप्रमाणे सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे आमदार कुणावार यांनी स्पष्ट केले.