नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पालघर:- जिल्ह्याचं आणि मोखाडा तालुक्याचं शेवटचं टोक म्हणजे सावर्डे गाव. त्यामुळे या भागाची हवी तशी प्रगती झालेली नाही. पण आपलं सरकार सत्तेत आल्यापासून एकूणच पालघर जिल्ह्यातल्या सर्व समस्या सोडवण्यावर आमचा भर आहे, हे तर तुम्हाला माहिती आहेच. परंतु अजूनही काही दुःखद घटना घडत आहेत याची खंत वाटते.
सावर्डे गावातल्या निंबारे कुटुंबावर दुर्गा या आपल्या अकरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला कुपोषणामुळे गमावण्याची वेळ आली. तसंच मुकणे परिवारातील रेणुका या अवघ्या ३ महिन्यांच्या मुलीला कुपोषणामुळे आपला जीव गमवावा लागला. आपल्या पोटचं मूल गमावण्या इतकं दुसरं दुःख या जगात नाही. या दुःखातून सावरण्यासाठी निंबारे आणि मुकणे कुटुंबांना बळ मिळावं यासाठी त्यांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती घेतली व त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
भविष्यात असे दुर्दैवी प्रकार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न आपल्या प्रशासनाकडून करण्यात येईल. या भागाच्या प्रगतीवर अधिकाधिक भर देऊन इथल्या कुपोषणासारख्या भीषण समस्यांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे.