मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश…
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
ठाणे:- ठाण्यातील उद्ध्व बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याच्या प्रभागातील सिध्देश्वर तलाव, खोपट, कोलबाड विभागात राहणा-या कार्यकर्त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पदाधिकारी म्हणून नेमणूक केल्याची बातमी सामना वृत्तपत्रात ज्या दिवशी प्रसिध्द झाली त्याच दिवशी त्याच शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’ मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शहर प्रमुख पदासाठी भास्कर पाटील यांची नेमणूक जाहीर केली होती, परंतु भास्कर पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषद घेवून मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टीप टॉप प्लाझा येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हातात घेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर ठाण्यातील हजारो शिवसैनिकांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते गर्दी करू लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज असंख्य पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होत आहेत. त्यातच आता खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख नेते यांच्या मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव खोपट च्या महिला आघाडी विभाग संघटक कविता निकम आणि कोलबाडचे विभागप्रमुख विनोद खानोलकर, कोलबाडचे उपविभागप्रमुख राजेश गवळी, कोलबाडचे शाखाप्रमुख संतोष जाधव, कोलबाडचे उपशाखाप्रमुख सचिन मिडके यांचा यात समावेश असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशही पार पडला आहे.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, उपशहरप्रमुख ठाणे विधानसभा क्षेत्र कैलास राख, महिला उपशहरप्रमुख संघटक, संज्योत दाते, विभागसंघटक पूजा तिडके, सचिन भोसले, आणि ठाणे जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महा राष्ट्र संदेश प्रती निधी श्री नितीन दत्ताराम शिंदे मुंबईकर….🙏🏼