संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अंधश्रद्धेचे जाळे तोडणाऱ्या अनेक बाबा महाराजांच्या अंधश्रद्धेचा मायाजालाचे पितळ उघडे पडणाऱ्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे.
श्याम मानव यांनी ‘दिव्य दरबार’वरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज हे नागपुर येथे आल्या नंतर यांना खुला चॅलेंज करून तुमची दिव्यशक्ती दाखवा आणि 30 लाख रुपयांचा बक्षीस घेऊन जा असे म्हटल होत. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराज श्याम मानव यांनी दिलेलं चलेंज न स्वीकारता तिथून पळून गेले होते.
त्यामुळे यांच्या मुद्यावरून आता चांगलच राजकारण तापले आहे. बागेश्वर महाराज यांना दिव्य शक्ती सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान देणारे जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पोलिसात तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून बंदूकधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.