Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सायकल राईड

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सायकल राईड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या वतीने ‘एक राईड मनोरुग्णांसाठी – त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी’ या नववर्षांतील पहिल्या सामाजिक राईडचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यात १०० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. राईड संपन्न झाल्यावर मनोरुग्णालयाच्या आवारात प्रमुख पाहुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, मनोरुग्णालया चे वैदयकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मनोरुग्णांसोबत सायकल चालवली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सायकल चालविणाऱ्या मनोरुग्णांना उपस्थित सगळेच प्रोत्साहन देत होते.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयापासून सायकल राईड सुरू झाली. डॉ. मुळीक, संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सेक्रेटरी दीपेश दळवी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरूवात करण्यात आली. यात स्पेशल फोर्सचे कमांडो, मनोरुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी देखील सहभागी झाले होते. संस्थेतर्फे मनोरुग्णांसाठी सायकल या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे दालन उभारण्यात आले होते. या दालनात व्यवसाय उपचार विभागाच्यावतीने १२ मनोरुग्णांकडून बनवून घेतलेल्या दोन सायकल देखील येथे ठेवण्यात आल्या होत्या. या दालनाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मंत्री यांच्या हस्ते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुर्यवंशी, डॉ. मुळीक आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनचे सदस्य वरुण भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सायकल आणि पर्यावरण यांची सांगड या चित्रांतून मनोरुग्णांनी घातली होती. मनोरुग्णांच्या अंगी अनेक कला दडलेल्या असतात त्यांना वाव देणे गरजेचे आहे अशा शब्दांत मंत्री यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मनोरुग्णांचे कौतुक केले. त्यानंतर मनोरुग्णांसाठी राईड केलेल्या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेतर्फे मनोरुग्णांना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. मंत्री म्हणाले की, आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे खरोखरच कौतुक आहे.

यावेळी त्यांनी उपस्थित सायकलप्रेमींना सायकल चालवण्याचे फायदे विचारले. यावेळी विश्वविक्रम विजेते, सायकलप्रेमी सतिश जाधव यांनी सायकलिंगचे फायदे नमूद केले. त्याला जोड देत सायकलिंगमुळे आजारांवरही मात करता येते असे मंत्री यांनी सांगितले. तसेच, सुर्यवंशी यांनी संस्थेचे काम पाहून मी देखील सायकलिंग करणार असल्याची ग्वाही दिली. डॉ. मुळीक आणि भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कोसिआ, डि के इंटरनॅशनल स्कूल, सिद्धिविनायक हॉस्पीटल आणि डॉ. शैलेश उमाटे, वेव्ह म्युझीक यांनी सहकार्य केले.

Previous Post

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विद्यमाने ‘आम्ही बाळासाहेबांच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती.

Next Post

अकोला जिल्हातील आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टरवर कारवाई करा: उमेश इंगळे यांची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अकोला जिल्हातील आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टरवर कारवाई करा: उमेश इंगळे यांची मागणी.

अकोला जिल्हातील आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टरवर कारवाई करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In