नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह यांनी साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक आज नवी दिल्ली येथे बोलावली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या मीटिंग मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. सुजय विखे, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल कुल, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. संतोष दानवे, आ. अभिमन्यू पवार आदी या बैठकीला उपस्थित होते.
साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर चर्चा झाली. या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले.
साखरेचा निर्यात कोटा हा वापरला गेला असल्याने हा कोटा वाढवून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली, त्यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन तसेच प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर आज चर्चा झाली. 20 विविध मुद्यांवर त्यांना काम करण्याची आता संधी मिळेल. त्यामुळे कृषी व्यवसाय संस्था म्हणून त्यांना काम करता येईल. यातून ग्रामीण भागात सहकार बळकट होईल. यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी सूचना अमित शाह यांनी केली आहे.