दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर , रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे आज गुरुवार दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत केला याप्रसंगी ध्वजपुजन करून ध्वजारोहण करण्यात आले व विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.
सकाळी सर्वप्रथम प्रभात फेरी काढली यामध्ये बालवर्ग ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यानी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर डॉ. लंके पिल्लेवर मॅडम यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे खजिनदार बाळासाहेब सावंत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, संचालक नीलकंठ लांडगे, सुमनताई गवळी व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब मसाळ, डॉ. वर्षा सदाफुले, प्रभागाचे नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, धनंजय भालेकर सभापती शिक्षण मंडळ, नवीन शेठ भालेकर, दीपक भालेराव (उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर, वंचित बहुजन आघाडी) व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, दादाराव कांबळे, नंदकिशोर घोडतके, उपाय राजा, उपस्थित होते.
या कार्यक्रमाला डॉ. लंके पिल्लेवार व डॉ. वर्षा सदाफुले यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व प्रथम संविधान दिंडी पूजन केले व सामुहिक संविधान वाचन करण्यात आले त्यांनतर विद्यार्थ्यानी अतिशय छान प्रकारे लेझीम , मनोरे , भाषणे व नृत्य सादर केले. तसेच या कार्यक्रमास ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेगवेगळ्या खेळामध्ये जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. मोहिते मॅडम व श्रीम. गायकवाड मॅडम यांनी केले व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.