संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
सविस्तर वृत्त खालील प्रमाणे जिल्ह्यात आदिवासी वसतिगृह शाळा सुरू होऊन डिड महिना लोटूनही सुरू झाले नाही राजुरा येथील वसतीगृहात मागील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना अजूनही प्रवेश दिला नाही यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत यामुळे त्यांच्यात कमी पणाची भावना निर्माण होत आहे असे असताना आदिवासी प्रकल्प कार्यालयाने कोणतीही व्यवस्था केली नाही. याची दखल घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष व ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी प्रकल्प अधिकारी यांना दि. 3/8/2022 ला राजुरा येथील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे असे निवेदनातून कळविले होते मात्र प्रकल्प अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेतली नाही यामुळे आज दि 8/8/2022 ला आदिवासी प्रकल्पकार्यालय चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.याची दखल आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहन घुघे यांनी घेऊन राजुरा येथील वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला यामुळे श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रविण चिचघरे,ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम, विद्यार्थी रोहीत छत्रपती पेंदोर, रितिक सहदेव कुमरे, प्रज्वल विजय कुमरे, उज्वल सुरेश आत्राम, आकाश चिंतामन तलांडे, खुशाल मनीराम कुळमेथे, अभिषेक संदीप टेकामठिय्या आंदोलनात उपस्थित होते