नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- रिक्षा चालकांनी लंपास केलेल्या ६० तोळे सोन्याच्या चोरीची उकल करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बिहारच्या नक्षलग्रस्त भागातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघेही रिक्षा चालक असल्याचे उघड झाले. सप्टेंबर महिन्यात तक्रारदार राजेश प्रेमजी वरिया हे छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रिक्षा पकडून घाटकोपर रेल्वे स्थानक येथे उतरत असताना रिक्षा चालकाने त्यांचे ३० लाख ६० हजार किमतीचे ६० तोळे सोने चोरी केले होते. मात्र, तक्रारदार पुढे आले नाहीत. अखेर, काही महिन्याने तक्रारदाराने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तपास अधिकारी ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. बिहार कनेक्शन उघडकीस येताच पथकाने नंदकिशोर बिसून यादव, साथीदार सरवणकुमार नकुल साह यांना नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे. आरोपितांनी गुन्ह्यातील चोरी केलेल्या ३०० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्यांपैकी एक सोन्याची बांगडी तेथील ज्वेलर्स नामे विवेक कुमार आणि ज्योती वर्मा यांना विकली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ३०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.