✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि विदर्भ प्रदेश अध्यक्ष किरणजी पांडव आणि वर्धा सह संपर्क प्रमुख राजेश सराफ तसेच जिल्हा प्रमुख गणेश इखार यांचा नेतृत्वाखाली हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात हिंगणघाट शहर अध्यक्ष पदी प्रफुल क्षीरसागर यांची निवड करण्यात आले. गेला 7 वर्षापासून त्यांनी शिक्षण, स्वास्थ, रोजगार या विषयावर काम करीत होते त्यांनी अंगणवाडीचे प्रश्न, मोठा नाला साफसफाई आणि रोड साफसफाई प्रश्न तसेच अनेक मुला मुलींना रोजगार देण्यात आले.
महिला गृह उद्योग विषयी मार्गदर्शन आणि महिलाना रोजगार देऊन महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा विषयावर काम करीत असल्यामुळे बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे महिला आघाडीचे हिंगणघाट विधानसभा मध्ये उपजिल्हा संघटिका पदी सौं. धनश्री क्षीरसागर यांची नियुक्ती करणात आली. निवड झाल्याबद्दल जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेशभाऊ सराफ, जिल्हा प्रमुख गणेश इखार, किशोर बोकडे, युवा सेनाजिल्हा प्रमुख निखिल सातपुते, हिंगणघाट विधानसभेचे उपजिल्हा प्रमुख रवीभाऊ धोटे, तालुका प्रमुख अमित गावंडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख महेश मुडे, उपशहर प्रमुख देवा शेंडे आणि उपशहर प्रमुख मनोज कोटकर,प्रशांत कंडे आणि नाभिक समाजातील विवेक अतकर, निलेश अतकर, अनिल अंबुलकर, हरिभाऊ मांडवकर, सूर्यकांत अतकर, रुपेश सौंदर्यकर, अनिल अतकर यांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348