बातमी संकलन: विक्की डोके, भंडारा
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- युथ फॉर सोशल जस्टीस भंडारा या संस्थेच्या वतीने युवा महोत्सव २०२३ “ध्येय शैक्षणिक क्रांतीचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा होत आहे. देश आणि युवा सशक्त होण्यासोबतच देशच्या विकासात तरुणांची महत्त्वाची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे असंख्य युवा तरुणाच्या पंखाला बळ देऊन त्यांच्या नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्दशाने या कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले आहे.
भंडारा येथील इंद्रराज सभागृह (सार्वजनिक वाचनालय), गांधी चौक, भंडारा येथे दि.29 जानेवारी 2023 ला आयोजित युवा महोत्सवात या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजता पुरुषोत्म तांबे (मुख्याध्यापक भागिरथा भास्कर हाय, भंडारा) हे करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून डॉ. शैलेंद्र कुकडे (सामाजिक कार्यकर्ता, भंडारा), संजीव बोरकर (सरचिटणिस ओबीसी सेवा संघ भंडारा जिल्हा) हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रमोद केसलकर (वायएसजे विदर्भ प्रदेश अध्यक्ष) हे करणार आहे.
त्यानंतर सकाळी 11.00 वाजता चर्चासतत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲड. प्रा. निलेश डहाट (संविधान अभ्यासक व विचारवंत, नागपूर) हे ओबीसीचे संविधानिक अधिकार या विषयावर आपले मार्गदर्शन करणार आहे.
त्यानंतर दुपारी 12.15 वाजता दुसऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रदिप मेश्राम (NEP अभ्यासक तथा विचारवंत, नागपूर) हे “नविन शिक्षण प्रणाली ओबीसी, एससी, एसटी साठी साधक की बाधक” या विषयावर आपले अनमोल मार्गदर्शन करणार आहे.
त्यानंतर दुपारी 1.45 वाजता तिसऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रमुख
मार्गदर्शक म्हणून मुकेश शेंन्डे (ओबीसी युवा विचारक, मुंबई) हे सध्याची ओबीसी चळवळीची दिशा व दशा या विषयावर आपले अनमोल मार्गदर्शन करणार आहे.
दुपारी 3.00 वाजता वर्धापन दिनाचा सोहळा होणार आहे. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन गोपाल सेलोकर (जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेवा संघ, भंडारा) हे करणार असून, या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनोज बन्सोड (सामाजिक कार्यकर्ता, लाखांदुर), प्रा. डॉ. ममता राऊत (स.प्रा.जे.एम पटेल कॉलेज, भंडारा) हे असणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय वाणे (मुख्य वायएसजे)हे असतील.
या नंतर दुपारी 4.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभाग युथ फॉर सोशल जस्टीस व भागिरथा भास्कर हायस्कुल, भंडारा हे करणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेऊन सहकार्य करावे असे आयोजक युथ फॉर सोशल जस्टीस, भंडारा यांनी म्हटल आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348