वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे/लोहगाव:- 26 जानेवारीला देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने देशभऱ्यात विविध रंगारंग देशभक्तीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणे येथील अजिंक्य डी. वाय. पाटील कॕंपस मध्ये पण प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अजिंक्य डी. वाय. पाटील कॕंपस मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण अजिंक्य डी. वाय. पाटील कॕंपस देशभक्तीच्या परीस्पर्शाने नहाले होते. यावेळी डॉ. ए. बी खेडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्धार्थी आणि प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी एन.सी.सी मधील छात्र सैनिकांनी अत्यंत लयबद्ध पद्धतीने कदम कदम बढाये जा या गीता वर परेड करून तिरंगा ध्वजाला सलामी दिली. सुरक्षा कर्मचारी यांनी पण यावेळी मार्चपास करून परेड केली.
प्रथमच अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्रात तिसरी एनसीसी युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यात सहभागी झालेल्या सर्व छात्र सैनिकांनी पूढे जाऊन भारताच्या लष्करी सेवेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे डॉ कवलजित कौर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
त्या नंतर डॉ. ए. बी. खेडेकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमत्त सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. देशसेवेसाठी सर्व विद्यार्थांनी समोर यायला पाहिजे प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय दिन असून या दिवशी आपले संविधान लागू करण्यात आले होते. हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.
अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगी वस्त्र परिधान करून सूंदर नृत्य सादर केले, तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फिटेल असे स्केटिंग केले, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य लायब्ररीचे उद्घाटन डॉ. ए. बी खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आनंदाचे वातावरण मिळावे यासाठी तिथे सेल्फी कट्टा ही तयार करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सेवाभावी संस्थांना सर्व धर्म समभाव या संकल्पने अंतर्गत पुलाव अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. ए. बी खेडेकर, संचालक डॉ. कवलजीत कौर, प्राचार्य डॉ. फारूख सय्यद, डेंटल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद शिगली, तंत्रनिकेतन समन्वयक डॉ. निगेश शेळके, सिव्हिल डिपार्टमेंट चे एच ओ डी संजय करोडपती सर रजिस्ट्रार श्री. गोरखनाथ देशमुख, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी श्वेता शर्मा, विविध विभागांचे प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रूप विद्यार्थी यांनी अन्नदान महादान या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348